लासलगाव : गत काही दिवसांपासून कोरोनामुळे बंद असलेले येथील रेल्वे स्थानकातील तिकीट आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करीत नागरिकांनी रांगा लावलेल्या दिसून आल्या.भुसावळ रेल्वे मंडल विभागाच्या आठ स्थानकांत आरक्षण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण करण्यासाठी व तिकीट रद्द करण्याकरिता सोमवारपासून भुसावळ मंडलाच्या आठ स्थानकांत आरक्षण कार्यालय सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एक खिडकी सुरू करण्यात आले आहे. आरक्षणधारकांनी कार्यालयात येताना मास्क लावणे बंधनकारक आहे.
लासलगावी रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:24 IST