नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाकडून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार असल्याच्या भीतीने गुरुवारी (दि. २२) नाशिककरांची बाजारात गर्दी उसळली होती. कडक निर्बंधांच्या भीतीने शहरातील विविध भाजी बाजार नागरिकांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. त्याचप्रमाणे किराणा दुकानांसोबतच औषधांच्या दुकानांतही नाशिककरांनी रांगा लावून जीवनावश्यक साहित्याची खरेदी केल्याचे दिसून आले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरात गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून आणखी कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केल्याने या निर्बंधांमध्ये काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. आरोग्य सेवा सुरू राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले असून, जीवनावश्यक सेवांही दिवसभरात काही तासांसाठी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांमध्ये निर्बंध कडक करण्याच्या प्रयत्नात स्थानिक बाजारातील किराणा व औषध विक्रेत्यांची दुकाने बंद होण्याची भीती नाशिककरांमध्ये दिसून आली. त्यामुळे शहरातील गोदावरी परिसर, सराफ बाजार, गणेशवाडी, सावरकरनगर, सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, उपनगर, नाशिकरोड भागातील भाजी बाजारामध्ये नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून किमान आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्यांची खरेदी केली. तर मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण महिना, दोन महिने पुरतील एवढ्या औषधांची खरेदी केली.
कोट-
भाजीपाला, किराणा सुरू राहणार असल्याचे सांगितले जात असले तरी बाजारात येण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आणखी कडक होण्याची भीती आहे. त्यामुळे आजच चार ते पाच दिवसांचा भाजीपाला आणि महिनाभराचा वाढीव किराणा खरेदी केली आहे.
पूजा पवार, गृहिणी
कोट-
सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिल्याचे समजले. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांना लागणारी दोन महिन्यांची डायबेटीसची औषधे एकाच वेळी घेतली आहेत.
राजेश जाधव, नागरिक,
===Photopath===
220421\22nsk_50_22042021_13.jpg
===Caption===
नाशिकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डानपुलाखालील भाजीखरेदीसाठी नागरिकांनी केलेली गर्दी