शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भैरवनाथ यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:24 IST

इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सालाबादप्रमाणे यंदाही चैत्रपौर्णिमेनिमित्त भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त देवीच्या व भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मूर्र्तींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशाच्या गजरात मिरवणूक विविध भागातून नेण्यात आली. यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सालाबादप्रमाणे यंदाही चैत्रपौर्णिमेनिमित्त भैरवनाथ महाराजांचायात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त देवीच्या व भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मूर्र्तींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशाच्या गजरात मिरवणूक विविध भागातून नेण्यात आली. यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.  नांदूरवैद्य येथे चैत्रपौर्णिमेनिमित्त भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळी सत्यनारायणाची पूजा मांडण्यात आली होती. यात्रोत्सवानिमित्त भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. यानंतर ढोलताशाच्या गजरात देवाची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणुकीत काढण्यात आली. सहभागी अश्वांनी तालावर नृत्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक ग्रामदैवत  भैरवनाथ महाराज यांच्या मंदिराजवळ आल्यानंतर भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी रथाचे पूजन करून देवाचे औक्षण केले.भैरवनाथ की जय, हनुमान की जयच्या जयघोषाने गाव परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री करमणुकीसाठी लोकनाट्याचा कार्यक्रम झाला.अश्वांचा नृत्याविष्कारयेथील यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रथयात्रा व अश्वांचे नृत्य. विविध वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी सहभागी अश्वांनी तालावर नृत्य सादर करून उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पेरणे फाडले. मिरवणुकीत लहानांपासून ते आबालवृद्धांनी सहभागी होत ठेका धरला. ‘भैरवनाथ महाराज की जय, बजरंगबली की जय’च्या जयघोषात मिरवणूक हळुहळू पुढे सरकत होती. मिरवणूक मारूती मंदिराजवळ आल्यानंतर भाविकांनी मारु तीचे पूजन करून दर्शन घेतले. भैरवनाथांच्या मुख्य मंदिराजवळ रथ आल्यानंतर येथे अश्वांच्या नृत्याची जुगलबंदी रंगली. त्यानंतर मंदिरात भैरवनाथ महाराजांचे विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक