शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाहन बाजारपेठेची कोटीच्या कोटी उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:47 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १८) नाशिकच्या वाहन बाजारात सुमारे ११०० ते १२०० चारचाकी वाहनांची विक्री झाली असून, सुमारे दोन हजाराहून अधिक दुचाकी वाहने विकली गेल्याने वाहन बाजारात जवळपास दीडशे कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले. तर अनेक ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे सुमारे चारशे ते पाचशे सदनिकांची बुकिंग आणि विक्री झाल्याचा अंदाज घर व जमीन विक्री व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देसराफ बाजाराला झळाळी : नाशिककरांची गृहखरेदीला पसंती

नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १८) नाशिकच्या वाहन बाजारात सुमारे ११०० ते १२०० चारचाकी वाहनांची विक्री झाली असून, सुमारे दोन हजाराहून अधिक दुचाकी वाहने विकली गेल्याने वाहन बाजारात जवळपास दीडशे कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले. तर अनेक ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे सुमारे चारशे ते पाचशे सदनिकांची बुकिंग आणि विक्री झाल्याचा अंदाज घर व जमीन विक्री व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.वाहन बाजार आणि बांधकाम व्यवसायासोबतच सराफ बाजार आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. अनेक ग्राहकांनी तोंडावर आलेल्या दिवाळ सणाच्या तयारीसोबतच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली. तर आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाजारात एसी, फ्रीज यांसारख्या गृहोपयोगी वस्तूंबरोबरच टीव्ही, वॉशिंग मशीन, ओव्हन आणि भेटवस्तूमध्ये मोबाइलसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट खरेदीला ग्राहकांचा अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूणच दसºयाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची वर्दळ वाढल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकांची लगबग वाढल्याचे दिसून आले. रिअल इस्टेटमध्ये तयार घरांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर, गोविंदनगर, नाशिकरोड, उपनगर, रविशंकर मार्ग, अशोका मार्ग भागातील नवनवीन प्रकल्पांमधील तयार फ्लॅट खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आला. तर अनेक ग्राहकांनी निर्माणाधिन प्रकल्पांमधील सदनिकांनाही पसंती दिली. दसºयाच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकींची डिलिव्हरी मिळून गेल्या १० ते १५ दिवसांपासून अनेकांनी वाहनांची बुकिंग केली होती. त्यामुळे सर्व ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देण्यासाठी वेगवेगळ्या शोरूमचालकांना कसरत करावी लागली. विविध कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स, वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य यामुुळे वाहनांची विक्री गतवर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी वाढली असून, दसºयाच्या दिवशी बाजारातील सर्व उच्चांक मोडीत निघाल्याचे दिसून आले. दसºयानंतर दिवाळीपर्यंत खरेदीचा हा उत्साह असाच कायम राहील, असा व्यावसायिकांना विश्वास आहे.सवलतींचा वर्षाव, ग्राहक आकर्षितदसºयाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स ग्राहकांना खरेदीकरिता प्रोत्साहन दिल्याचे दिसून आले. शून्य डाउन पेमेंट, विशिष्ट बँकेचे क्रे डिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त डिस्काउंट, कॅशबॅक यांसारख्या आॅफर्सची ग्राहकांना भूरळ पडल्याचे दिसून आले. वित्तसंस्थांनी कर्जप्रक्रिया सुलभ केली असून, शंभर टक्क्यांपर्यंतचे कर्ज आणि सुलभ हप्ते यामुळे घर, वाहन आणि सोने खरेदीसोबत गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रिक उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांची पावले वळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

टॅग्स :Dasaraदसराbusinessव्यवसाय