शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

नगरसेवकांच्या कोलांटउड्यांमुळे नागरिक स्तंभित

By admin | Updated: May 24, 2016 23:45 IST

शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीची शर्यत : मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेसचा मार्ग खडतर

 मनोज मालपाणी  नाशिकरोडसाडेचार वर्षांपूर्वी झालेल्या मनपाच्या निवडणुकीत नाशिकरोड विभागामध्ये सहा नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांमुळे या पक्षाला मोठी रसद पुरवली होती. परंतु आता या सहांपैकी चार जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने नाशिकरोडमध्ये मनसेचे फक्त दोन नगरसेवक राहिले आहेत. तर कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या देखील एक-एक नगरसेवकाने शिवसेना-भाजपाचा रस्ता पकडला आहे. यामुळे मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी यांची भविष्यातील वाटचाल अधिक खडतर झाली आहे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या मनपाच्या निवडणुकीत नाशिकरोड विभागातून शिवसेनेचे सात- सुनीता कोठुळे, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, शिवाजी सहाणे, कोमल मेहरोलिया, शैलेश ढगे, मंगला आढाव; मनसेचे सहा- हेमंत गोडसे, रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, अशोक सातभाई, संपत शेलार, शोभना शिंदे; भाजपाचे दोन- संभाजी मोरूस्कर, सविता दलवाणी; रिपाइं आठवले गट दोन- सुनील वाघ, ललिता भालेराव; राष्ट्रवादी चार- हरिष भडांगे, शोभा आवारे, रंजना बोराडे, वैशाली दाणी; कॉँग्रेसचे दोन- कन्हैया साळवे, वैशाली भागवत; अपक्ष- पवन पवार असे २४ नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीत शिवसेना-रिपाइं आठवले गटाची युती होती. प्रभाग ६१ मधून निवडून आलेले मनसेचे हेमंत गोडसे यांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनसेशी काडीमोड घेत शिवबंधन बांधले. त्या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे केशव पोरजे विजयी झाले. त्यानंतर गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे संपत शेलार, शोभना शिंदे हेदेखील शिवसेनेत दाखल झाले. मनसेने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी शेलार व शिंदे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला. मात्र त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांनी कॉँग्रेसचे कन्हैया साळवे, वैशाली भागवत यांनीदेखील शिवबंधन बांधले होते. मात्र नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने स्थायी सदस्य म्हणून न घेतल्याने साळवे, भागवत हे काही महिन्यांतच पुन्हा कॉँग्रेसवासी झाले. मनसेचे पहिले महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्यासोबत माजी स्थायी सभापती रमेश धोंगडे यांनी मनसेला रामराम ठोकत पुन्हा स्वगृही शिवसेनेत दाखल झाले. काही दिवसांपूर्वी जेलरोडच्या राष्ट्रवादीच्या रंजना बोराडे, माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांनीदेखील शिवबंधन बांधून घेतले. पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक राजकारण व पुढील राजकीय भविष्य लक्षात घेऊन या पक्षातून त्या पक्षात असा खो-खो चा खेळ सध्या सुरू आहे. तर शिवसेनेच्या कोमल मेहरोलिया व माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया हेदेखील शिवबंधन सोडून ‘जय श्रीराम’ म्हणत भाजपावासी झाले आहेत. तर मुंबईत दोन दिवसांपूर्वीच कॉँग्रेसचे कन्हैया साळवे यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश करून घेतला. तसे साळवे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी बॅँकेचे संचालक व मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत गायकवाड यांनीदेखील भाजपात प्रवेश केला. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठेने काम करणारे व नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात शिवसेनेची ताकद वाढविणारे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांनी कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसेनेतून बाहेर पडत भाजपामध्ये प्रवेश केला.जेथे सरशी... सरशी तेथे उड्या घेणारे नगरसेवक नवीन नाहीत. सध्या शिवसेना आणि भाजपाची चलती असल्याने या पक्षांमध्ये आयारामांची संख्या अधिक आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कोण आले अन् कोण गेलं हे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. तर शिवसेना-भाजपा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सर्वांसाठी दरवाजे उघडे करून ठेवले आहेत. सर्वसामान्य नागरिक मात्र नगरसेवकांच्या पक्षीय कोलांटउड्यांनी स्तब्ध झाले आहेत.