शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाटणेत अतिवृष्टीने पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:02 IST

पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून नेला. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.

पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून नेला. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.मका, बाजरी, डाळिंब, कांद्याचे रोपं, नवीन लागवड झालेले कांद्याचे अतोनात नुकसान झाले. परसूल धरणाच्या पाण्याने धोक्याच्या पातळी गाठली आहे. धरणाच्या भिंतीवरून तीन ते चार फुट पाणी वाहत असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परसुल नदी दुथडी भरून वाहू लागली असून तसेच गावाजवळील नाल्यांना पुर आल्याने आरोग्य केंद्राजवळील मातीबंधारा पूर्ण भरल्यामुळे पाटणे वाके रस्ता पाण्याखाली गेला असून बंधारा जवळील अरूण धनवट यांच्या खळ्यात पाणी शिरल्याने बाजरीचा चारा व कांद्याचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून मदत करण्याची मागणी अरूण धनवट यांनी केली आहे. परसूल नदीला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुर आला. परसुल नदीवरील जागेत गावाच्या जवळ उभारलेल्या तलाठी कार्यालयात पाणी साचले आहे. तातडीने पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी