शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सिन्नर तालुक्यात दुष्काळ पाहणीसाठी पीक कापणी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:58 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली.

ठळक मुद्देमार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश

सिन्नर : सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसाने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व गावे ही दुष्काळ ग्रस्त असून केवळ ७३ गावे दुष्काळात न धरता संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त धरून पाणी टँकर, चारा छावण्या, विद्यार्थ्यांची फी माफी, वीज बिल माफी, २०१७ ची कर्जमाफी अश्या विविध मागण्यांचे पत्र माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांकडे देऊन शासनाकडे केली होती. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जिल्हा प्रशासनाने लक्षात न घेतल्याने माजी आमदार कोकाटे यांनी ५ आॅक्टोबर रोजी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परिस्थितीची भयानकता लक्षात आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला पीक कापणी प्रयोगाचे आदेश दिल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. १८ सप्टेंबर रोजी सिन्नर तालुक्यात झालेल्या अत्यल्प पर्जन्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरकरांनी मोर्चा काढला होता. दुष्काळी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने व दुष्काळाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी नांदगाव ,मालेगाव, सिन्नर तालुक्यात पीक कापणीचे प्रयोग तातडीने राबवून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात जिल्हाधिकारी यांना दिले. माजी आमदार कोकाटे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री यांना म्हटले आहे की ,सिन्नर तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा अत्यंत कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून प्रशासनाने शासन निर्णयानुसार सर्वेक्षण करून उपाय योजना करण्याबाबत विनंती केली होती. पर्जन्यमानात ३ ते ४ आठवडे खंड पडल्याने ७५ % पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कुठलेही सर्वेक्षण अद्याप केले नाही. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देऊन पाच मागण्या कोकाटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. तालुक्यात चारा छावण्या, मागेल त्या गावाला पाणी टँकर, शेतपंपाची वीजबिल माफी, विद्यार्थ्यांची फी माफी, मार्च २०१७ अखेर तालुक्यातील शेतकºयांची सर्व प्रकारची कर्ज माफी या मागण्यांचा त्यात समावेश आहे.मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर जिल्हा यंत्रणा गतिमान झाली आहे. सिन्नरसह इतर टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिले आहेत. तालुक्यातील प्रत्येकी १० गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करत तिथे हे प्रयोग राबवण्यात येणार आहेत. सदर अहवाल शक्य तितक्या लवकर राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून, राज्य स्तरावर टंचाई घोषित करून त्याचा अहवाल केंद्राकडे मदतीसाठी सादर करीत मागणी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.