शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:43 IST

माळवाडी : देवळा तालुक्यात जून ते सप्टेंबर पर्यंत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या मका, बाजरी, सोयाबीन, मुंगसह पोळ कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर पिकांचे अतोनात नुकसान होत आले आहेच; पण जोरदार झालेल्या पावसाने शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने उन्हाळी कांद्याच्या रोपांचे लाखो रु पयाचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने बुरशी रोगाचा प्रादुर्भाव व तीव्र ऊन यामुळे उन्हाळ कांदा पीक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याच्या मार्गदर्शनाचा आभाव

माळवाडी : देवळा तालुक्यात जून ते सप्टेंबर पर्यंत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या मका, बाजरी, सोयाबीन, मुंगसह पोळ कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर पिकांचे अतोनात नुकसान होत आले आहेच; पण जोरदार झालेल्या पावसाने शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने उन्हाळी कांद्याच्या रोपांचे लाखो रु पयाचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने बुरशी रोगाचा प्रादुर्भाव व तीव्र ऊन यामुळे उन्हाळ कांदा पीक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.देवळा तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षात ओला दुष्काळाने खरीप तर कोरडा दुष्काळाने रब्बी पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकरी करत आला आहे. यावर्षी पावसाळ्याची सुरु वात चांगली होऊन खरिपाची पेरणी झाली असली तरी हंगामातील पोळ कांदा, रब्बी हंगामातील लागवड करण्यासाठी उन्हाळ कांदा रोप, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, कोथंबीर आदी पिकांचे बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात सापडले आहेत. या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी हवालदिल झाले आहेत.उन्हाळ कांदा रोप पिवळी होऊन मर रोगाचे बळी पडत आहेत. त्यामुळे आगामी उन्हाळ कांदा लागवडीवर लाखो रु पयांचा खर्च आज कांदा बी करिता होत आहे. परिणामी लागवडीसह उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच खरिपातील कापणीला आलेल्यामका, सोयाबीन, बाजरी, मुंगसह टोमॅटो, कोबी, फ्लॉवर कोथंबीर आदी पिकांचे काढणीचे नियोजन करण्यासाठी हवामान खात्याकडून योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने कापणी नियोजन करणे सतत अवघड होतं चालले असल्याची खंतही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. या हवामान खात्याकडून पावसाच्या अंदाजाने अचूक मार्गदर्शन सूचना नसल्याने कापून पडलेला मका, सोयाबीन, बाजरी पिकांना आता कोंब येऊ लागले असल्याने शेतकरी चांगलाच चिंताचुर झाला आहे.खरीप पीक कापणी नियोजन व रब्बी बी पेरणीसाठी हवामान खात्याकडून तालुकास्तरावर अचूक मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. जेणे करून नुकसानीचा सामना करतांना नियोजन करण्यासाठी मदत मिळत जाईल.- दादा बस्ते, शेतकरी, लोहणेर.भाजीपाला पिकांचे मर रोगाने नुकसान होत असतांना गोगलगाय, हुमणी, डावण्या, करपा बुरशी यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या प्रसंगी हवामान खाते व कृषी खात्याकडून गावपातळीवर वेळो वेळी मार्गदर्शन गरजेचे आहे.- उषाताई शेवाळे, सरपंच, फुलेमाळवाडी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती