शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी करपला मका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:46 IST

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी निफाड तालुक्यातील अनेक भागांत अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. खरिपातील पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देदेवगाव परिसरातील शेतकरी चिंतातुर ; खरिपातील पिकांची वाढ खुंटली

देवगाव : पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी निफाड तालुक्यातील अनेक भागांत अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. खरिपातील पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. दुबार पेरणीचे सावट शेतकरीवर्गावर घोंगावत असल्याने शेतकरीवर्ग चातकासारखी पावसाची वाट बघत आहे. देवगाव परिसरातील जलसाठे अद्यापही तहानलेले आहेत.देवगाव परिसरातील बंधारे व तलाव कोरडेच आहेत. इतर काही दिवसांत अशीच परिस्थिती राहिली तर देवगावकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यातील फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीसाठा कमी झाला असल्याचे चित्र होते. एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हामुळे परिस्थितीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे बहुतेक भागाचा पाणीसाठा खालावला असल्याने अनेक भागांत भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे.काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर पेरणी व लागवड झालेली आहे. काही भागातील पिके सलाईनवर असल्याने पावसाची अपेक्षा आहे. आता तर शेतकऱ्यांनी पिकांना मोठा खर्च केला. त्यात पावसाने दडी मारल्याने आणि दोन महिन्यांत पिकांना आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईचे सावट अधिक गडदबळीराजाच्या पिकांना मिळणारा मातीमोल भाव, सक्तीची वीजबिल वसुली, रासायनिक खतांचे वाढते भाव, मजूर टंचाई, सोसायट्यांचे कर्ज व पावसाने पाठ फिरविल्याने परिसरात शेती व्यवसाय तोट्यात असून, वाढती महागाई यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. वेधशाळेच्या अंदाजाने आशा पल्लवित झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले असले तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे ऊन धरायला लागलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. देवगाव परिसरातील अनेक गावांत पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. येणाºया काळात चांगला पाऊस न झाल्यास खरीप पिकांसाठी लागणाºया सिंचनासह पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होईल.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी