शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटावर तोडगा : शेतकरी, व्यापाऱ्यांच्या संगनमताने रानमाळावर पर्यायी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:44 IST

मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर  गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा कृषिमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील विविध भागांतील किरकोळ विक्रेत्यांनाही व्यवसायात अडचणी येत असल्याने त्यांनीही महामार्गालगतच्या माळरानावर दुकाने लावली आहे.

ठळक मुद्देशेतकरी, व्यापाऱ्यांनी रानमाळावर सुरू केला बाजार मुंबई-आग्रा महामार्गालगत कृषीमालाचे व्यावहार

नाशिक : रायगडनगर ते वाडीवऱ्हे दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर  गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा कृषिमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील विविध भागांतील किरकोळ विक्रेत्यांनाही व्यवसायात अडचणी येत असल्याने त्यांनीही महामार्गालगतच्या माळरानावर दुकाने लावली असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी या भागात पर्याय बाजार उभार राहिला आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यवहारांवर निर्बंध आले होते. त्यामुळे पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबेबहुला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरांतील शेतकऱ्यांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यवहारांना बाजाराचे स्वरूप येऊन मोठ्या प्रमाणात कृषी मालाची उलाढाल होऊ लागली असून, शेतक ºयांनाही कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे बाजार सुरू करताना शेतकरी व व्यापाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईचाही सामना करावा लागला. परंतु, मोकळ्या माळरानावर शेतकऱ्यांनी परस्परांमध्ये अधिक अंतर राखून व्यवहार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून, येथे रोख स्वरूपातील कृषिमाल खरेदी विक्रीचे व्यवाहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. 

शेतकऱ्यांवर कारवाई, पर्यटकांकडे कानाडोळा गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत काही प्रमाणात पालेभाज्या आवक घटल्याने पालेभाज्याही महागल्या होत्या. तर दुसरीकडे शेतातील पिकांचे बाजार उपलब्ध होत नसल्याने नुकसान होत होते. त्यामुळे शेतकरी अशा पर्यायी ठिकाणांवर कृषी मालाची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतमालाची विक्री कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे याच भागातील टेकड्यांवर श्रावणसरींनी पसरलेल्या हिरवळीवर सहलीचा आनंद घेणाºया पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यांच्याकडे मात्र पोलिसांकडून कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रायगडनगर समोरील टेकडी लष्करी हद्दीला लागून असतानाही या ठिकाणी साप्ताहिक सुटीच्या दिवशी शहरवासीयांचे अक्षरश: लोंढेच येत असताना स्थानिक पोलिसांचे त्याक डे मात्र दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरीMarketबाजार