शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:03 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी वर्गावरील दुबार पेरणीचे ...

ठळक मुद्देपावसाची दमदार हजेरी :बळीराजांच्या आशा पल्लवित

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असुन शेतकरी वर्गावरील दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे.लखमापूर व परिसरात आषाढी एकादशी नंतर पाऊस गावब झाला होता. दिंडोरी तालुक्याला संपूर्ण नाशिक जिल्ह्यात द्राक्षे पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु कोरोना व कमी भाव यामुळे या द्राक्षे पंढरीला संकटमय स्वरु प प्राप्त झाले आहे. रब्बी हंगाम गेला. आता सर्व तयारी व आशा ठेवून बळीराजां खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी तयारीला लागला. परंतु खरीप हंगामाची पहिली संकटमय सुरु वात झाली ती बियाने खरेदीपासून, कारण लॉक डाऊनची स्थिती असल्यामुळे दुकाने बंद असायची. तरी पण मिळेल त्या ठिकाणाहून महागडी बियाने शेतकरी वर्गाने खरेदी केली. व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पेरणीला सुरु वात केली. परंतु पुढे पावसाने लहरीपणा दाखवत दडी मारली. आषाढी एकादशी नंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या व पिकांना जीवदान मिळाले. आता शेतातून अंकुर काढु लागले. परंतु काही बियाणांची उगवण झाली नाही. तर काहींची उगवण झाली. त्यामुळे बळीराजांच्या समोर खराब बियाणे निघाल्याचे संकट निर्माण झाले.परंतु काही बियाने मात्र चांगले उगवले. पिके जोमाने जमिनीतुन वर येत असतांना पुन्हा पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पिके पाण्याअभावी करपू लागली. तेव्हा मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन वेगवेगळी पिके घेतली. आता एक दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस झाल्याने बळीराजांच्या समोरील दुबार पेरणी चे संकट टळले आहे.कृत्रिम संकट..खरीप हंगाम करीत असतांना बळीराजांवर अस्मानी व सुलतानी संकटाबरोबर आता नवीन कृत्रिम संकट आले आहे. ते म्हणजे युरिया खताचा तुटवडा. बुकिंग करून ही युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. शासनाने आदेश काढून ही शेतकरी वर्गाला खताचा तुटवडा येणे ही चिंतेची बाब आहे. असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस