शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभमपार्क’ बनला गुन्हेगारांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:23 IST

गेल्या काही वर्र्षांपूर्वी टिप्पर गँगचा अड्डा असलेल्या शुभमपार्क भाग हा टिप्पर गॅँगच्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई केल्यानंतर शांत झाला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर पुन्हा गुन्हेगारांचे ठिंकाण म्हणून चर्चेत आला आहे. याच भागात मागील महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या दुकानावर जाऊन संशयित आरोपीने ठाकरे यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी (दि.८) याच शुभमपार्क भागात भरदिवसा एका तरुणाचा निर्घृण खून करण्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देपोलिसांचा धाक कमी; सिडकोवासीय भयभीत

सिडको : गेल्या काही वर्र्षांपूर्वी टिप्पर गँगचा अड्डा असलेल्या शुभमपार्क भाग हा टिप्पर गॅँगच्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई केल्यानंतर शांत झाला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर पुन्हा गुन्हेगारांचे ठिंकाण म्हणून चर्चेत आला आहे. याच भागात मागील महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या दुकानावर जाऊन संशयित आरोपीने ठाकरे यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी (दि.८) याच शुभमपार्क भागात भरदिवसा एका तरुणाचा निर्घृण खून करण्याचा प्रकार घडला. या परिसरात वाढलेल्या गुन्हेगारांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे विद्यमान आमदार व शिवसेनेचे विद्यमान नगरसेवकांचे संपर्क कार्यालयदेखील शुभमपार्क भागातच असतानाही या ठिकाणी गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गेल्या महिन्यात संशयित निखील पगारे याने मामा ठाकरे यांच्या शुभमपार्क येथील दुकानातून मद्य घेतल्याने पगारे याच्याकडे दुकानातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले असता पगारे याने ठाकरे यांना फोनवर धमकी देत त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबत पगारे याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना अद्यापही संशयित निखील पगारे याला पकडण्यात यश आलेले नाही. याच शुभम पार्कच्या परिसरात शुक्रवारी (दि.८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वैभव उर्फ बबलू गांडोळे या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. दुचाकीवर आलेले शुभम पेंढारे व प्राज्वल चौधरी हे दोघे संशयित सीसीटीव्हीच्या कॅमेºयात खून करून फरार झाल्याचे दिसून येत आहे. याच शुभमपार्क भागात महिलांची सोनसाखळी चोरी करण्याचे प्रकारही घडत असून, संपूर्ण शुभमपार्क परिसरातील नागरिक सध्या दहशतीखाली आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी