नाशिक : कंपनीने भरलेल्या आयकराच्या परताव्याच्या रकमेचा चेक देण्यासाठी लाच घेणारा विक्रीकर निरीक्षक रंजन लहामगे आणि प्लॉटवर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी नवीन परदेशी या दोघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर गुरुवारी रंगेहाथ पकडले होते़ब्ल्यू चिपस् कंट्रोल्स प्रायव्हेड लिमिटेड कंपनीकडे विक्रीकर निरीक्षक रंजन लहामगे याने आयकर परताव्याच्या चेकसाठी भरलेल्या रकमेच्या दहा टक्क्यांची म्हणजेच ४८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले़ दसक येथील तलाठी नवीन परदेशी याने एका प्लॉटवर नाव लावण्यासाठी शिल्पविहार को-ऑप. हौसिंग सोसायटीच्या सचिवाकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली़ सापळा रचून लाचेची ही रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले़ या दोघाही लोकसेवकांवर लाच मागणे व स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)
लाचखोर विक्रीकर निरीक्षक व तलाठ्याला पोलीस कोठडी
By admin | Updated: May 17, 2014 00:34 IST