शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

शहरातील २०० आंदोलकांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: October 11, 2016 01:11 IST

शहरातील २०० आंदोलकांवर गुन्हे दाखल

नाशिक : तळेगाव येथील अत्याचारप्रकरणी रविवारी (दि़९) शहरात आंदोलने होऊन काही ठिकाणी वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळही करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस आयुक्तालयातील आडगाव, अंबड, सातपूर, इंदिरानगर, देवळाली कॅम्प यांसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे २०० आदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ पाथर्डी फाटा येथील शिवाजी पुतळ्यासमोरील आंदोलनास हिंसक वळण लागले. या ठिकाणी काही आंदोलक हे रस्त्यावरील वाहनांना अडवून घोषणाबाजी करीत होते़ या आंदोलनकांना पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे हे समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली़ यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे जखमी झाले़ याप्रकरणी पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच दगडफेकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये पाथर्डी फाटा, पिंपळगाव खांब, राणेनगर, दाढेगाव, चेतनानगर, मोरवाडी येथील आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस (एमएच २०, ८६५४) आंदोलनकर्त्यांनी प्रतीक्षा हॉटेलसमोर अडवून घोषणा देत गाडीच्या काचा फोडल्या. तसेच गाडीचे सीटही पेटवून दिले. याप्रकरणी अज्ञात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा येथे दुपारी ३.४५च्या सुमारास निमाणी ते अंबड (एमएच ४०, ४५५६) ही शहर बस अडवून दगडफेक केली. त्यामध्ये बसचालक संजीव कदम जखमी झाल़े याप्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात १२ आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प परिसरात दुपारी ५ वाजेच्या सुमारास शिवडे ते भगूर (एमएच १५ एके ८०६४) या बसवर विजयनगर बस स्टॉपजवळ आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या़ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सुमारे २० आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास महात्मानगर येथील सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले़ या प्रकरणी संत कबीरनगर येथील सहा युवकांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, सोमवारी (दि़१०) पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलनकर्त्यांची ओळख पटवून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)