शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

चांदवडला मास्क नसणाऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:37 IST

विनामास्क फिरणाºया नागरिकांना मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या पुढाकाराने चांदवड नगर परिषदेच्या पथकामार्फत कार्यवाही करण्यात आली.

चांदवड : शहरात विनामास्क फिरणाºया नागरिकांना मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या पुढाकाराने चांदवड नगर परिषदेच्या पथकामार्फत कार्यवाही करण्यात आली. यावेळी स्वत: मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी विनामास्क घालणाºया नागरिकांना पाचशे रुपये दंड करून नगर परिषदेमार्फत मास्क देऊन त्यांना मास्क घालण्याचे व विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नगर परिषदेने भाजीपाला विक्रेत्यांवरही भाजीपाला विकताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे व स्थायी स्वरूपात भाजी विकताना गर्दी केल्यामुळे नगर परिषदेने संबंधित विक्र ेत्यांवर गुन्हा दाखल केला. सदर पथकामध्ये चांदवड नगर परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, स्थापत्य अभियंता अनिल कुरे, संजय क्षीरसागर, यशवंत बनकर, श्रावण कापसे, शरद धोतरे आदी उपस्थित होते. चांदवड नगर परिषद कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे ३ मे २०२० पर्यंत शहरातील सर्व दुकाने ही मेडिकल व दवाखाने सोडून दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहतील व इतर आस्थापना बंदच राहतील, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.आहेर यांच्या उपस्थितीतरमजानसंदर्भात बैठकचांदवड : येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत विश्रामगृहावर बैठक झाली. बैठकीत मदत नव्हे कर्तव्य या हेतूने तालुक्यातील गोरगरीब जनतेला आजपर्यंत किती अत्यावश्यक वस्तू तसेच भाजीपाला वाटप झाला याचा आढावा घेतला. तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना फेस शिल्ड उपलब्ध करून दिले असून, दोन ते तीन दिवसात सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचेल असे सांगितले. रमजान सणाविषयी नियोजन संदर्भात तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या समवेत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समिती सदस्य डॉ. नितीन गांगुर्डे, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, विजय धाकराव, योगेश ढोमसे, नगरसेवक जगन राऊत, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, अशपाक खान, जावेद घासी, महेश खंदारे, कासिफ खान, मुकेश आहेर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य