शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १५१ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:03 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरिक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : अत्यावश्यक कामांसाठी जाणाऱ्यांना परवानगी देणार

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरिक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत कामासाठी जाणारे व येणारे तसेच नियमित वैद्यकीय सेवेसाठी जाणाºया नागरिकांसाठी कोरोना मदत कक्षाची स्थापनादेखील करण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार आहेत.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरात संचारबंदी लागू असून त्यादृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपाययोजनांच्या दृष्टीने बैठक घेतली. त्यात संचारबंदी स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात न घेता जे अकारण रस्त्यावर फिरत आहेत, अशा उत्साही नागरिकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत भादंविक १८८ (१) प्रमाणे १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, संचारबंदी कालावधीत जीवनावश्यक सेवा आणि अन्य सेवा देण्यासाठी कोरोना मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विविध १२ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घोषित करण्यात आले असून, कोरोना.नाशिकसिटीपोलीस.ग्जीओव्ही.इन या संकेतस्थळाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.याशिवाय भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अत्यावश्यक वस्तू नागरिकांच्या घराच्या परिसरातच उपलब्ध होतील, यादृष्टीने पूर्तता करण्याबाबत नांगरे पाटील यांनी सूचना केल्या आहेत.नागरिकांना आवश्यक कामासाठी अथवा अत्यावश्यक सेवेतील कामसाठी बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी दिनांक, वेळ, दररोज जायचे-यायचे असेल तर त्याच्या वेळा त्यासंबंधीच्या कारणांचा स्पष्ट उल्लेख करावा, डायलेसीस किंवा अन्य वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडायचे असेल तर त्याबाबतच्या व्यक्तींची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावी, असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले आहे.संचारबंदीमुळे सध्या होस्टेलमध्ये राहणाºया विद्यार्थ्यांच्या भोजनाची गैरसोय होत आहे. मात्र त्यांना पार्सलमार्फत जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याबाबतदेखील पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी सूचना केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस