शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:37 IST

शहराच्या मध्यवर्ती परिसराची हद्द असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त करण्यात आलेले सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्यापुढे राहणार आहे.

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती परिसराची हद्द असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नव्याने नियुक्त करण्यात आलेले सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्यापुढे राहणार आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून लूटमार, वाहनचोरीसह देहविक्रयसारखे अवैध व्यवसाय तेजीत आले आहेत.सरकारवाडा पोलीस ठाणे गंगापूररोडवरील आयुक्तालयाशेजारी आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहराच्या बाजारपेठेसह मध्यवर्ती भाग येतो. जिल्हा न्यायालयापासून जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत महत्त्वाचे सरकारी कार्यालये, अस्थापना या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत कायदासुव्यवस्था चोखपणे ठेवण्याचे आव्हान बोरसे यांच्यापुढे असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पोलीस ठाण्यामधील ठाणे अंमलदार कक्षापासून थेट गुन्हे शोध पथकापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी लागणार असून, आलेली मरगळ झटकावी लागणार आहे. तक्रारदारांसह सर्वसामान्यांना योग्य ती माहितीदेखील संबंधितांकडून पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीक्रमांकावर संपर्क साधून दिली जात नसेल तर परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांसंबंधी कितपत गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठांपर्यंत माहिती पोहचविली जात असेल? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.उद्धटपणे नागरिकांशी संवादसरकारवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया हद्दीमधील नागरिक संमिश्र असून, कोणी डॉक्टर, वकील, व्यावसायिक, शिक्षक-प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक या वर्गातील आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे नागरिक आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या आशेपोटी सरकारवाडा पोलीस ठाण्याची पायरी चढतात, त्यांच्या तक्रारींचा निपटारा तर दूरच मात्र उद्धटपणाचा संवाद पदरी पडतो, असे गाºहाणे नागरिकांनी मांडले आहे. यामुळे आगामी काळात नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्याकडून सरकारवाडा पोलीस ठाण्यामधील वागणूक सुधारण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी