समीर पठाण याने ८ नोव्हेंबरला शिवपुरी चौकात विना परवाना बॅनर, टेबल, खुर्च्या लावून एकत्रित ३० ते ४० लोकांना जमवून वाढदिवस साजरा केला. यावेळी जमलेल्या गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊन सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात समीर पठाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे करीत आहे .
कोरोनाकाळात विनापरवानगी वाढदिवस करणाऱ्या समीर पठाणवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST