शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या दोन खासगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 01:02 IST

नाशिक : मालेगाव येथील सटाणा रोडवरील सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाच्या संचालकाने आरोग्य विभागातील करारनामा व प्रभाग १ कार्यालयातील करारनाम्यात तफावत करून महापालिकेची दोन लाख ३० हजार २५६ रुपयांची आर्थिक फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी संचालक रमणलाल कन्हैयालाल सुराणा यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : सुमारे सव्वादोन लाख रुपयांची फसवणूक

नाशिक : मालेगाव येथील सटाणा रोडवरील सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाच्या संचालकाने आरोग्य विभागातील करारनामा व प्रभाग १ कार्यालयातील करारनाम्यात तफावत करून महापालिकेची दोन लाख ३० हजार २५६ रुपयांची आर्थिक फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी संचालक रमणलाल कन्हैयालाल सुराणा यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या ७ जून रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी संबंधित खासगी रुग्णालयावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम महापालिकेला दिला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने रुग्णालयाची पाहणी व कागदपत्रांची पडताळणी केली. यात प्रथम दर्शनी रुग्णालय संचालक सुराणा यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महापालिकेचे उपआयुक्त राजू खैरनार यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाने रजिस्ट्रेशन करण्यासाठी महापालिकेच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०२० रोजी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्यांनी अग्निशमन विभागाचा दाखला जोडला होता. अग्निशमन अधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी २०२० रोजी दाखला दिल्याचे नमूद केले होते. मात्र, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडून अग्निशमन ना हरकत प्रस्ताव सादर केला नसल्याने त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले नसताना रुग्णालयाच्या संचालकांनी बनावट दाखल्यावर सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय असे नाव टाकून ना हरकत दाखला तयार करून महापालिकेची फसवणूक केली.आरोग्य अधिकाऱ्यांना हटविलेमहापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मनपा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. हेमंत गढरी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून अवाजवी बिले आकारली जात होती. तसेच सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाच्या प्रकरणामुळे महापालिका कारवाई करीत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचा रोष वाढला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. ठाकरे यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी