नाशिक : फे सबुक या सोशल नेटवर्क साइटवर हिंदीतून अपमानकारक मजकूर टाकून व त्यावर कमेंट करून बदनामी केल्याचा गुन्हा वेगवेगळ्या शहरांतील पाच नेटिझन्सवर दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी अकोला येथील स्वप्नील पुरुषोत्तम जैसवाल, अहमदनगर येथील राहुल धोत्रे, कल्याण येथील अभिजित इंगळे, नागपूर येथील आशिष जैसवाल, पुणे येथील गौरव खासजीवलो यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सिडकोच्या छत्रपतीनगर येथील विलास विश्राम गांगुर्डे यांच्या फेसबुकवरील छायाचित्रावर या पाच संशयितांनी कमेंट्स केल्या होत्या़ यामध्ये ‘फोटोतील व्यक्तीने बीएएमएसच्या दोन विद्यार्थ्यांना त्रास दिला असून, नापासही केले आहे’ असे त्यात म्हटले होते. २७ फेबु्रवारीच्या या घटनेची गांगुर्डे यांनी ३ मार्चला तक्रार दाखल केली होती़ सायबर क्राईम ब्रँचकडून खात्री झाल्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
बदनामी करणार्या पाच नेटिझन्सवर गुन्हा
By admin | Updated: May 23, 2014 00:30 IST