गुन्हे शाखेने जप्त केल्या आठ दुचाकी

By Admin | Updated: August 26, 2016 00:21 IST2016-08-26T00:20:52+5:302016-08-26T00:21:00+5:30

गुन्हे शाखेने जप्त केल्या आठ दुचाकी

The crime branch seized eight bikes | गुन्हे शाखेने जप्त केल्या आठ दुचाकी

गुन्हे शाखेने जप्त केल्या आठ दुचाकी

नाशिकरोड : क्राईम ब्रॅँच युनिट ३ च्या पथकाने संशयित युवकाकडून शहराच्या विविध भागातून चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.
सुरगाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याप्रकरणी एक संशयित मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. क्राईम ब्रॅँच युनिट ३ चे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख यांना शहराच्या विविध भागांतून चोरून विकलेल्या मोटारसायकलींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांनी कारागृहात दरोड्याच्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित प्रेम ऊर्फ सोन्या अशोक पगारे (२७) रा. बोरीचा पाडा दिंडोरी याला न्यायालयाकडून हस्तांतर करण्याचे आदेश पारीत करून ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित ऊर्फ सोन्या पगारे यांची कसून चौकशी केली असता त्याने आडगाव, सरकारवाडा, उपनगर, लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली चोरून विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The crime branch seized eight bikes