शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

गावठी कट्ट्यासह गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:10 IST

गावठी कट्टा विक्रीसाठी शहरात आलेल्या नाशिकरोड भागातील एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित गुन्हेगारास भद्रकाली पोलिसांनी ३० हजारांच्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.

नाशिक : गावठी कट्टा विक्रीसाठी शहरात आलेल्या नाशिकरोड भागातील एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित गुन्हेगारास भद्रकाली पोलिसांनी ३० हजारांच्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.एक इसम बेकायदेशीरपणे गावठी कट्टा विक्रीसाठी काठेगल्ली भागातील तपोवन रस्त्यावरील चौफुलीवर येणार असल्याची गुप्त माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मुळे, कय्यूम सय्यद, कुणाल राउत, वसीम शेख, सुरेश खालकर, इरफान शेख, गणेश निंबाळकर यांच्या पथकाने तपोवनरोडवरील ‘त्या’ चौफुलीच्या परिसरात सापळा रचला. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास संशयित गुन्हेगार अक्षय गणेश नाईकवाडे (वय २३, रा. सामनगावरोड) हा एका रिक्षामधून उतरताच पथकाने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. सय्यद यांनी त्यास ओळखून नाशिकरोडच्या एका मारहाणीच्या गुन्ह्यात तो फरार होता, अशी माहिती मुळे यांना तत्काळ दिली. गावठी पिस्तुलासह, काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी