दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथे एका युवतीला मोबाईलवरील मेसेजद्वारे मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध सोमवारी (दि.८) गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली.जानोरी येथील अभियांत्रिकी कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीचा मोबाईल नंबर मिळवून त्याच गावातील २३ वर्षीय युवकाने तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर वेळोवेळी तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून त्या युवतीने दि. २२ फेब्रुवारी रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली.
युवती आत्महत्येप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:07 IST