शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालकास मारहाण प्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:09 IST

वणी-नाशिक रस्त्यावर सुरगाणा येथील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यात अडवून संबंधित चालक दिगंबर गावित यास मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी : वणी-नाशिक रस्त्यावर सुरगाणा येथील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यात अडवून संबंधित चालक दिगंबर गावित यास मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर मारहाण प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार मंगळवारी (दि. १७) सायंकाळी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. तत्पूर्वीच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आंदोलनास स्थगिती देण्यात आली. मात्र आंदोलकांनी एकत्र येत ठिय्या देत सदर महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत अटक कररण्याची मागणी केली.संबंधित महिलांवर कडक कारवाई करण्यासाठी वणी पोलीस ठाण्यात आंदोलक जमा झाले होते. यासाठी आदिवासी बचाव समिती, अदिवासी संघर्ष समिती, प्रहार संघटना व भारिप बहुजन महासंघ भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच आमदार नरहरी झिरवाळ हे या ठिकाणी आले होते. नियोजित आंदोलन असल्याने पोलीस कुमक मागवली होती.सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वणी पोलीस ठाण्यास छावणीचे स्वरूप् आले होते. संबधीत महिलांना अटक झालीच पाहीजे यासाठी पुन्हा वणी पोलीस ठाण्यात घरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी आमदार नरहरी झिरवळ यांनी पोलीसांच्या कारभराबाबत कानपीचक्या देत चांगलाच समाचार घेतला . या ठिकाणी तपास प्रमुख सदाशिव वाघमारे ,यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले. यावेळी सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगुर्डे, सुरगाणा शिवसेनेचे मोहन गांगुर्डे, आदिवसाी संघर्ष समितीचे विजय घोटे गणेश पवार सुरगाणा, महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियानाचे संदीप जगताप , अमोल गावित , काशीनाथ भोये , चेतन राउत,केशव भोये , श्यामराव ढुमसे , दशरथ महाले, विजय गोतरणे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .:

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक