मेहुणेला घरफोडी करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:07 IST2021-01-24T04:07:17+5:302021-01-24T04:07:17+5:30

------------------------- आयेशानगर भागात दोन लाखांचा मुद्देमाल लंपास मालेगाव : शहरातील आयेशानगर भागातून अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ...

Crime against three persons for burglary of Mehune | मेहुणेला घरफोडी करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा

मेहुणेला घरफोडी करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा

-------------------------

आयेशानगर भागात दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

मालेगाव : शहरातील आयेशानगर भागातून अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून १ लाख ९९ हजार ९२९ रुपयांची रोकड चोरून नेली आहे. या प्रकरणी इरफान खान अक्रम खान यांनी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड चोरून नेली आहे. पुढील तपास हवालदार गुळे करीत आहेत.

------------------------

मालेगावी एकावर कटरने वार

मालेगाव : शहरातील एका यंत्रमाग कारखान्यात किरकोळ कारणावरून एकावर कटरने वार करून, जखमी करणाऱ्या शाळीराज अहमद साहेबद्दीन याच्याविरुद्ध आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अश्रफ अली मो.हसन यांनी फिर्याद दिली आहे.

---------------------

गुरव गल्लीतून दुचाकी लंपास

मालेगाव : शहरातील सोमवार वार्डातील गुरव गल्लीतून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी पवन दिलीप प्रमाणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची दुचाकी क्रमांक एम एच ४१ बीसी ८९८६ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. पुढील तपास हवालदार खरगे करीत आहेत.

Web Title: Crime against three persons for burglary of Mehune