घोटी : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे गुरु वारी २१ वर्षीय मुलीसह महिलेचा विनयभंग केल्याच्या दोन घटना घडल्या. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सर्वतीर्थ टाकेद येथील एक ३१ वर्षीय युवती किराणा दुकानात किराणा आणण्यासाठी जात असताना गावातील स्वप्नील राजू कोरडे, राजू लक्ष्मण कोरडे व संदीप राजू कोरडे यांनी या युवतीची छेडछाड करून विनयभंग केल्याची तक्रार युवतीने घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे, तर दुसऱ्या घटनेत याच गावात महिलेचा गावातील तिघांनी विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे.यानुसार घोटी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
इगतपुरी तालुक्यात विनयभंग प्रकरणी सहा जणांविरु द्ध गुन्हा
By admin | Updated: August 12, 2016 22:38 IST