शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मालेगावच्या एमआयएमच्या आमदाराविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:43 IST

नाशिक : मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह इतर अकरा जणांविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह इतर अकरा जणांविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक किशोर डांगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि.२५) रात्री हा प्रकार घडला होता.एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी डॉ. किशोर डांगे यांना तुम्ही माझा फोन का उचलला नाही, खलील दादाला का रुग्णालयात दाखल केले असे विचारत व त्यांच्या सोबत असलेल्या नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, नईम अहमद युसुफ इलियास, अकलम अन्सारी यांच्यासह पाच अनोळखी इसमाने आरडाओरड करीत शिवीगाळ केली तसेच डॉ. डांगे यांना धक्काबुक्की केली. दालनात असलेल्या कर्मचाऱ्यांना हाता-चापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन कार्यालयात कोंडून ठेवले. सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एन. देशमुख हे करीत आहेत. 

टॅग्स :Policeपोलिस