वणी : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी यांना धमकावून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी सतीश दिलीप जाधव याच्यावर वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, वणी ग्रामीण रुग्णालयात कोमल देवीदास चौरे या वैद्यकीय अधिकारी गेल्या दहा महिन्यांपासून कार्यरत आहेत. १४ एप्रिल रोजी सकाळपासून डॉ. चौरे कर्तव्य बजावत होत्या. दुपारी १ वाजून १५ मिनिटाचे सुमारास शवविच्छेदन करून आल्या असता पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी सतीश दिलीप जाधव हा ग्रामीण रु ग्णालयात आला व माझा फोन का उचलला नाही, असे विचारून धमकी देऊ लागला. शवविच्छेदन करत असल्याने व फोन सायंलेट होता म्हणून उचलला नाही, असे चौरे यांनी सांगितले तेव्हा जुना घटनाक्रम आठवण करून देईन, ग्रामसभेत केलेला ठराव विसरल्या असणार, ग्रामपंचायतमधे ठराव करून नागपूरला बदली करून टाकेल, असा दम दिला. तसेच सहा ते सात वेळा ग्रामीण रु ग्णालय येथे येऊन धमकी दिली, अशी तक्र ार डॉ. चौरे यांनी दिली आहे.दरम्यान, डॉक्टर चौरे यांना काही घटकांनी तक्रार मागे घेण्यास दबावतंत्राचा वापर केला. मात्र त्याला न जुमानता वारंवार होणाºया जाचाला कंटाळून डॉ. चौरे यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. भादंवि कलम ३५३ व ५०६ अन्वये सतीश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधवविरोधात कारवाईसतीष दिलीप जाधव याचेवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तसेच जिल्हा न्यायालयात अब्रुनुकसानीचे दोन दावे दाखल असुन स्थानिक गुन्हा शाखेने जाधव या चे विरोधात कारवाई करून बंधपत्रही करून घेतले होते
बाजार समितीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:31 IST
वणी : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी यांना धमकावून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी सतीश दिलीप जाधव याच्यावर वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजार समितीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
ठळक मुद्देवणी : वैद्यकीय अधिकाºयास धमकावणे पडले महागात स्थानिक गुन्हा शाखेने जाधव या चे विरोधात कारवाई करून बंधपत्रही करून घेतले होते