शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

आमदार हिरामण खोसकर यांच्यासह कॉंग्रेसच्या १६पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 16:38 IST

१६ पदाधिकारी व अन्य २५ कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक अशोक पाथरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्दे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : कोरोनाची साथ सुरु असल्याने साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत विविध निर्बंध लागू असून राजकीय, सामाजिक आंदोलनांवर बंदी असतानाही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी एकत्र येत हातात काळे झेंडे घेऊन एमजीरोडवर आंदोलन केले होते. या आंदोलनाप्रकरणी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केंद्र सरकारमध्ये मोदी यांच्या सत्तेला सात वर्षे पुर्ण झाल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या वतीने एम.जी.रोडवर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, प्रवक्ता हेमलता पाटील, माजी मंत्री महिला आघाडीच्या शोभा बच्छाव, सुरेश मारू, राजेंद्र बागुल, रऊफ कोकणी, रमेश पवार, बबलु खैरे, दर्शन पाटील, भारती गीते, राजेंद्र ठाकरे, स्वप्नील पाटील, ज्ञोनेश्‍वर काळे यांच्यासह एकुण १६ पदाधिकारी व अन्य २५ कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरिक्षक अशोक पाथरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपनिरिक्षक कोल्हे हे करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcongressकाँग्रेसShobha Bachchavशोभा बच्छाव