शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांना जीएसटी नोंदणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:19 IST

व्याजाव्यतिरिक्त कर्ज देण्यासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या शुल्कांवर जीएसटी भरणे आवश्यक असल्याने पतसंस्थांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सनदी लेखापाल अनिल पळसुले यांनी केले.

सिन्नर : व्याजाव्यतिरिक्त कर्ज देण्यासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या शुल्कांवर जीएसटी भरणे आवश्यक असल्याने पतसंस्थांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सनदी लेखापाल अनिल पळसुले यांनी केले. सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या पुढाकारातून सिन्नर सार्वजनिक वाचनलयाच्या सभागृहात कार्यशाळा पार पडली. त्यावेळी पळसुले बोलत होते. पतसंस्था फेडरेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष नारायण वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत सनदी लेखापाल एस. झेड. देशमुख, प्रभारी सहायक निबंधक सुनील कासार, तालुका फेडरेशनचे कार्याध्यक्ष युनूस शेख आदी उपस्थित होते.  २० लाखांच्या वर वार्षिक उत्पन्न असणाºया पतसंस्थांना जीएसटीची नोंदणी करणे आवश्यक आहे. एवढे उत्पन्न नसले तरी कर्जाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी वकिलाची नियुक्ती केली असेल तर अशा प्रत्येक संस्थेलाही नोंदणी करणे आवश्यक असल्याचे पळसुले यांनी सांगितले.  कर्ज अथवा ठेवीवरील व्याजवगळता कर्जासाठी घेतलेल्या सर्व्हिस चार्जेससह इतर सर्व उत्पन्नावर जीएसटी लागू होतो. व्याजवगळता संस्थेच्या नफा-तोटापत्रकावर ज्या ज्या गोष्टी येतील त्या सर्वांना जीएसटी लागू होणार असल्याने उत्पन्न कमी असले तरी अशा संस्थांना जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे. मात्र या सर्व त्रासातून सुटका हवी असल्यास सर्वांना शिस्त अंगीकारावी लागणार आहे.  वेळच्या वेळी सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. संस्थेच्या अनेक शाखा असतील तर प्रत्येक शाखेचा हिशेब त्या-त्या शाखेला ठेवावा लागणार असल्याचे ते म्हणाले. जीएसटी कायद्यातील विविध तरतुदींची माहिती त्यांनी दिली. मच्छिंद्र चिने यांनी सूत्रसंचालन केले. जीएटीप्रमाणे के्रडीट रिटर्न संस्थेने घेतलेल्या फर्निचर असो वा संगणक अथवा त्याचे सॉफ्टवेअरसाठी जीएसटी भरावा लागणार आहे़ जीएटीप्रमाणे के्रडीट रिटर्न मिळविण्यासाठी संस्था प्राप्त ठरते. जीएसटी हा कायदा असल्याने देशात जीएसटी व इन्कम टॅक्स हे दोनच कर अस्तित्वात आहेत़ या कायद्यात सुसूत्रता आली आहे. याशिवाय कार्यालयांच्या अधिकाºयांशी संपर्क न साधताही सर्वांना आॅनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे अधिकाºयांच्या त्रासापासून सुटका झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकGSTजीएसटी