नाशिक : भूतकाळाचे संदर्भ घेत त्यावर संशोधन करून इतिहासाला वर्तमानातील विचारधारेची जोड देत लेखन केल्यास भविष्यासाठी नवीन विचारधारा निर्माण होईल, असे प्रतिपादन नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे डॉ. उमेश कदम यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बीसीयूडी विभाग व केटीएचएम महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे ‘न्यू ट्रेंड्स इन हिसट्रोग्राफी’ या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. मीनाक्षी देवरे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, मुंबई विद्यापीठ इतिहास विभागाचे डॉ. किशोर गायकवाड, डॉ. नारायण भोसले आदि उपस्थित होते.विद्यार्थ्यांना नवनवीन विषयांची माहिती व्हावी व अभ्यास करता यावा, त्या विषयात संशोधन करता यावे यासाठी इतिहास लेखनातील नवे विचारप्रवाह विषयावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रसंचालन प्रा. संदीप भामरे यांनी, तर आभार प्रा. एम. डी. पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)
इतिहासाला वर्तमानाची जोड दिल्यास नवीन विचारधारेची निर्मिती
By admin | Updated: February 22, 2017 23:19 IST