शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मृत्युमुखींच्या स्मरणार्थ दिवे प्रज्वलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:34 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षितता अभियान : अभिनव पद्धतीने वेधले नागरिकांचे लक्ष

पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.या अभियानाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.८ ) सायंकाळी गंगाघाटावर प्रादेशिक परिवहन कार्यालय, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, नन्ही कली फाउंडेशन, वाव फाउंडेशन व आॅल इंडिया ट्रान्सपोर्ट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी करण्यात येऊन गेल्यावर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १०४१ नागरिकांना भारताच्या आकाराचा नकाशाचा करून दिवे लावत श्रद्धांजली वाहण्यात आली.गेल्यावर्षी जिल्हा व शहरात १०४१ नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिक देशाचे नागरिक होते व त्यांचे देशासाठी काहीतरी योगदान असल्याने आता ते देशाला मिळू शकत नाही त्यांनी देशासाठी केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून शुक्र वारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गंगाघाटावर शेकडो दिवे पेटविण्यात आले होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, संदीप निमसे, धनंजय गोसावी, निंबा अहेर, कमलाकर धोंगडे, आदींसह फाउंडेशनचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते.जनजागृती : श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नयेपुढल्यावर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त गंगाघाटावर चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस