शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

भाकपाचे समर्थन, राष्ट्रवादीकडून निषेध

By admin | Updated: July 6, 2014 00:46 IST

भाकपाचे समर्थन, राष्ट्रवादीकडून निषेध

 

नाशिक : राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या बेमुदत संप आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. या संपामुळे रुग्णसेवा ठप्प झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हा सचिव कॉ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सरकार जाणून बुजून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे महाराष्ट्रात रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्याची तक्रार करण्यात आली. यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांना निवेदन देण्यात आले, त्यात शासनाने वैद्यकीय अधिकारी संघटनेशी चर्चा करून त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात दत्तू तुपे, राजपाल शिंदे, राजू उदमले, रमेश ठाकूर, किरण मालुंजकर, व्ही. डी. धनवटे, संगीता उदमले, विमल पोरजे आदि सहभागी झाले होते. संपकरी डॉक्टरांवर कारवाई करादरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ग्राहक संरक्षण समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संपावर गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार ते पाच दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी संपावर गेले असून, रुग्णांचे हाल होत आहेत. खासगी रुग्णालयात जाऊन त्यांना उपचार करून घ्यावे लागत असल्याने शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व आडमुठेपणा करीत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध मेस्मा अंतर्गत कारवाई करून त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी अ‍ॅड. सुरेश आव्हाड, सुरेश खेताडे, डॉ. रामराव पाटील, बाजीराव घुगे, सदाशिव नाईक, ललित शिंदे, मंगला चव्हाण, सनी भडांगे, नंदा वाकडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)