सातपूर : जनतेच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माकपच्या वतीने शहरात विविध ठिकाणी देशव्यापी निदर्शने करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा साडेसात हजार रुपये रोख दिले पाहिजेत. सहा महिने दरडोई दहा किलो धान्य मोफत पुरविले पाहिजे. मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवावा, शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करावी, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता जाहीर करावा, राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे, कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घेण्यात यावे, शेतकऱ्यांचे तातडीने कर्जमाफ करून, तत्कळ नवीन कर्जवाटप करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, माकपाच्या शहर सेक्रेटरी अॅड. वसुधा कराड, अॅड. तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे, दगडू व्हडगर, सिंधू शार्दूल, पुरुषोत्तम गायकवाड, मोहन जाधव, संतोष काकडे, तुकाराम सोनजे आदी उपस्थित होते. शहरातील खुटवडनगर, सातपूर, म्हाडा वसाहत भागात निदर्शन आंदोलन करण्यात आले.
विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात माकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:27 IST