शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

इंधन दरवाढीच्या विरोधात माकपाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 18:43 IST

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यात येवून कोर्ट फी मध्ये झालेल्या दरवाढीचाही निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात माकपाने म्हटले आहे की, सन २००२ मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर

ठळक मुद्दे २८ रूपये दराने मिळणारे पेट्रोल जनतेला ८१ रूपयांनी खरेदी करावे लागत कोर्ट फी मध्ये झालेल्या दरवाढीचाही निषेध

नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून एक प्रकारे जनतेला महागाईच्या खाईत लोटल्याचा आरोप करीत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यात येवून कोर्ट फी मध्ये झालेल्या दरवाढीचाही निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात माकपाने म्हटले आहे की, सन २००२ मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर असतानाच इंधन दरावरील सरकारचे नियंत्रण काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यावेळी झालेल्या विरोधामुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही ती आता मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. श्रीमंताच्या महागड्या गाड्यांना लागणारा पेट्रोलचा खर्च सरकारने सबसिडी देवून का करावा असा मतप्रवाह सरकारने त्यावेळी व्यक्त केला होता. परंतु देशात पेट्रोल व डिझेलचा सर्वाधिक वापर मालवाहतुकीसाठीच होत असून, सरकारने दरवाढीवरील नियंत्रण काढून घेतल्याने साहजिकच महागड्या दराने इंधन घेवून मालवाहतुक करावी लागत आहे. त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीवर झाला आहे. दुसरीकडे आंतरराष्टÑीय बाजारपेठेत क्रुड आॅईलचे दर कमी झालेले असताना सरकारने इंधनावर एकच कर प्रणाली लागू न करता चार प्रकारचे कर आकारणी केल्यामुळे २८ रूपये दराने मिळणारे पेट्रोल जनतेला ८१ रूपयांनी खरेदी करावे लागत आहे. त्याचा परिणाम महागाई वाढीवर झाला आहे. त्याच बरोबर राज्य सरकारने कोर्ट फी मध्ये वाढ करून सर्वसामान्य नागरिकाला न्याय नाकारण्याची भुमीका घेतली आहे. कोर्टात न्याय मागण्यासाठी लागणा-या खर्चात चार ते पाच पट वाढ करण्यात आली असून, अशीच दरवाढ २००४ मध्येही केंद्रात भाजपाचे सरकार असताना करण्यात आली होती. त्यामुळे भाजपाची जनता विरोधी धोरणे या निमित्ताने स्पष्ट झाली असून, ही दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या आंदोलनात डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, गौतम कोंगळे, तानाजी जायभावे, देवीदास अडोळे, सिंधु शार्दुल, संतोष काकडे, दिनेश सातभाई, हिरामण तेलोरे, सतीष खैरनार, मोहन जाधव, संजय पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक