शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

वाहनचालकांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:38 IST

मनपातील वाहनचालकांना प्रिंप्री-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर वेतनश्रेणी देण्याच्या विषयावरून प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक : मनपातील वाहनचालकांना प्रिंप्री-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर वेतनश्रेणी देण्याच्या विषयावरून प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाने प्रिंपी-चिंचवड महापालिकेला ९३००-३४००-८००० ग्रेड पे ४२०० अशी वेतनश्रेणी काही वर्षांपूर्वी मंजूर केली होती. त्या आधारे नाशिक महापालिकेतील सर्व वाहनचालकांना ती लागू व्हावी, अशी मागणी होती. महासभेत यासंदर्भात ठराव करण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त भास्कर सानप असताना त्यांनी शासनाच्या मंजुरीच्या आधीन राहून ती लागू केली. सदरच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर झाल्यानंतर शासनाने महापालिका अधिनियम ५१ (४) अन्वये याबाबत शासन स्तरावरील नसल्याने महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे स्पष्टकेले.दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने लोकल फंड आॅडिट करताना शासन मंजुरी नसल्याचा आक्षेप घेतला आणि त्यामुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम असताना ज्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती त्यांच्याकडून वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. त्यातील सेवानिवृत्तांचे तर वेतनही रोखण्यात आले.यासंदर्भात वाहनचालक संघटनेच्या वतीने नाशिकच्या औद्योगिक न्यायालयात तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी चालकांच्या बाजूने निकाल दिला. या दाव्यासाठी वाहनचालक संघटनेचे सल्लागार गुरुमित बग्गा, उप मुख्य सल्लागार मोहन रानडे यांनी सहकार्य केले. शुक्रवारी (दि.२६) निकाल लागल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गोराडे यांनी जल्लोष केला.स्थगितीची मागणीमहापालिका प्रशासनाने ज्या ८३ वाहनचालकांच्या बाजूने निकाल लागला, त्यांच्या विरोधात याचिका दाखल केलीच, परंतु यापूर्वी घाईघाईने वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याने ती अदा करण्यास स्थगिती करण्याची मागणी केली. यासंदर्भात न्या. सांबरे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली व त्यांनी औद्योगिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. वाहनचालकांच्या बाजूने अ‍ॅड. किरण बापट यांनी युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. एस. डी. तांबट व अ‍ॅड. विशाल तांबट यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCourtन्यायालय