शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तस्कर टोळीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:31 IST

वनविभागाने त्यांच्या जामीनास विरोध करत संशयितांना जामीन मंजूर झाल्यास तपास थंडावेल आणि तस्करीची साखळी पुर्णपणे फोडणे अशक्य होईल असा युक्तीवाद

ठळक मुद्देन्यायालयीन कोठडी कायम पुढील सुनावणी सोमवारी

नाशिक : भारतीय वन्यजीव कायद्यानुसार अतिसंरक्षित सुची-१ मधील मांडूळ सर्पासह गोड्या पाण्यात राहणाऱ्या मऊ पाठीच्या कासवाची तस्करी करणाºया १९ तस्करांच्या टोळीचा जामीन अर्ज येवला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी जैसे-थे ठेवली. या खटल्यावर पुढील सुनावणी येत्या सोमवारी (दि.२२) होणार आहे. ठाणे येथील एक सहायक पोलीस निरिक्षकासह पुण्याच्या पोलीस कर्मचा-याचाही टोळीत समावेश आहे.भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांनुसार वन्यजीवांची तस्करी अजामीनपात्र गुन्हा ठरतो. अंधश्रध्देला खतपाणी घालत त्यापोटी वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्नात असलेल्या १९ तस्करांच्या मुसक्या नाशिक पुर्व वनविभागाच्या येवला वनपरिक्षेत्र व वणी दक्षता पथकाने बांधल्या. या तस्करीचे धागेदोरे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर अहमदनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांपर्यंतही पोहचल्याचे तपासातून पुढे आले. येवला वनपरिक्षेत्रात असलेल्या सत्यगावमधील संशियत सोमनाथ रामनाथ पवार (२२) यासह एका अल्पवयीन मुलाला वनक्षेत्रपाल संजय भंडारी व त्यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीतून एकापाठोपाठ एक संशियतांची माहिती समोर येत गेली. ठाणे येथील रबाळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके आणि पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातील रायटर दीपक गोवर्धन धाबेकर, आयटी कंपनी मालक निलेश रामदास चौधरी (रा. चाकण), अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक महेश हरिश्चंद्र बने यांच्यासह अन्य सर्व संशियतांभोवती वनविभागाच्या पथकाने फास आवळला. दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल बशीर शेख यांच्या पथकाने अहमदनगर येथून संशयित आरोपी ज्ञानेश्वर वाबळे व निखिल गायकवाड यांना बेड्या ठोकल्या. यावेळी निखिलच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात दडवून ठेवलेल्या अवस्थेत अतिसंरक्षित वन्यजीव कासव आढळून आले होते. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, या सर्व संशियतांच्या जामीनासाठी वकिलांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र वनविभागाने त्यांच्या जामीनास विरोध करत संशयितांना जामीन मंजूर झाल्यास तपास थंडावेल आणि तस्करीची साखळी पुर्णपणे फोडणे अशक्य होईल असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फेअ‍ॅड. ए. एस. वैष्णव यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत तस्कर टोळीचा जामीन नामंजूर करत त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली.

दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल बशीर शेख यांच्या पथकाने अहमदनगर येथून संशयित आरोपी ज्ञानेश्वर वाबळे व निखिल गायकवाड यांना बेड्या ठोकल्या. यावेळी निखिलच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात दडवून ठेवलेल्या अवस्थेत अतिसंरक्षित वन्यजीव कासव आढळून आले होते.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकwildlifeवन्यजीवsnakeसापCourtन्यायालय