शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटी रुपये भरण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:33 IST

आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची २१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला़

नाशिक : आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची २१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला़ या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी व भारत सोनवणे यांना १५ कोटी रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी मंगळवारी (दि़३०) सुनावणीदरम्यान दिले़  मिरजकर सराफ गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित व संचालक महेश मधुकर मिरजकर, प्राजक्ता रवींद्र कुलकर्णी, भारत मार्तंडराव सोनवणे आणि इतर यांनी गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला असून यावर गत काही दिवसांपासून न्यायालयात सुनावणी सुरू होती़ न्यायाधीश देशमुख यांच्या न्यायालयात मंगळवारी जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून, सामान्यांकडून योजनेच्या नावाखाली संशयितांनी पैसे जमा करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा युक्तिवाद केला़ तसेच आरोपींनी केलेली फसवणुकीची रक्कम २१ कोटी रुपयांच्या वर गेली असून, गुंतवणूकदांचे २४,८८३़१६ ग्रॅम सोनेही लाटले आहे़ तसेच या गुन्ह्यातील प्रमुख हर्षल नाईक, माजी नगरसेवक यांच्यासह काही जण फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे़  अ‍ॅड़ केंगे यांच्या फिर्यादीनुसार संचालक महेश मिरजकर, हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले, श्रेयस आढाव, परीक्षित औरंगाबादकर, सुरेश भास्कर, भारत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व कीर्ती नाईक यांच्याविरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़न्यायाधीश देशमुख यांनी उभयपक्षांचा युक्तिवाद विचारात घेऊन संचालक महेश मिरजकर यास पाच समान हप्त्यात ५ कोटी रुपये व ५० लाख रुपयांचा बॉण्ड, प्राजक्ता कुलकर्णी, कीर्ती नाईक, भारत सोनवणे, वृषभ नगरकर, विजयदीप पवार यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये दोन समान हप्त्यात भरण्याचे आदेश दिले असून काही अटी व शर्तींवर जामीन देण्याचे निर्देशित केले आहे़

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाNashikनाशिक