शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट फीवाढीचा निषेध : बार असोसिएशनचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:13 IST

राज्य सरकारने १९९८ सालच्या कायद्यात बदल करून १६ जानेवारी २०१८ पासून न्यायालयीन शुल्कात भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेवर अन्याय केल्याचा आरोप करत पूर्वीचीच पद्धत अंमलात आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सटाणा बार असोसिएशनने दिला आहे. सटाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

सटाणा : राज्य सरकारने १९९८ सालच्या कायद्यात बदल करून १६ जानेवारी २०१८ पासून न्यायालयीन शुल्कात भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेवर अन्याय केल्याचा आरोप करत पूर्वीचीच पद्धत अंमलात आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सटाणा बार असोसिएशनने दिला आहे. सटाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रभारी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. शासनाने केलेल्या दुरुस्तीनुसार कोर्ट फीमध्ये सामान्य माणसाचा कोणताही विचार न करता भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. गरिबातल्या गरीब माणसाला न्याय मिळावा व न्याय मिळण्यापासून कोणीही वंचित राहू नये अशी भारतीय राज्यघटनेची संकल्पना असताना राज्य शासनाने या संकल्पनेलाच हरताळ फासला आहे. सामान्य जनतेने कोर्टाची पायरीच चढू नये अशा प्रकारची तरतूद महाराष्ट्र सरकारने केल्याचा आरोप सटाणा बार असोसिएशनने केला आहे. कोर्ट फीची पूर्वीचीच पद्धत अंमलात आणावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी सटाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांच्यासह उपाध्यक्ष अ‍ॅड. एन. पी. चंद्रात्रे, अ‍ॅड. नाना भामरे, एस. आर. अहिरे, नीलेश डांगरे, यशवंत पाटील, व्ही. बी. सोनवणे, व्ही.एम. सोनवणे, व्ही. एम. सोनवणे, व्ही. एस. जगताप, सोमदत्त मुंजवाडकर, एस. एस. मानकर, आर. जे. पाटील,पी. के. गोसावी, मनीषा ठाकूर, स्मिता चिंधडे, क्रांती देवरे, श्रीमती एस. पी. पाठक आदी वकील उपस्थित होते.  चांदवड : महाराष्टÑ शासनाने कोर्ट फी अ‍ॅक्टमध्ये दुरूस्ती करून सामान्य माणसाचा कोणताही विचार न करता फीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. चांदवड तालुका वकील संघाच्या वतीने या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला असून, शासनाने कोर्ट फीवाढीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या अर्ज करण्यास कोर्ट फी स्टॅम्प दहा रुपयाचा लागत होता; मात्र आता तो पन्नास रुपयाचा लागत आहे, तर या प्रकारचे सर्वच अर्ज व खटल्यासाठी कोर्ट फी स्टॅम्प वाढीव करून एक प्रकारे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार केला आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी सर्व वकिलांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, बार कौन्सिलचे अध्यक्ष, नाशिक जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक