शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
2
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
3
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
6
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
7
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
8
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
9
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
10
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
11
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
12
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
13
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
14
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
15
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
16
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
17
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
19
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
20
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी

विमा नाकारणाऱ्या कंपनीस न्यायालयाचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:53 IST

मद्यसेवनाचे खोटे कारण दाखवून विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीस ग्राहक न्यायालयाने दणका दिला असून, अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने पाच लाख व रुग्णालयीन उपचारासाठी एक लाख अशी सहा लाखांची भरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद सोनवणे यांनी एचडीएफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़

नाशिक : मद्यसेवनाचे खोटे कारण दाखवून विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीस ग्राहक न्यायालयाने दणका दिला असून, अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने पाच लाख व रुग्णालयीन उपचारासाठी एक लाख अशी सहा लाखांची भरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद सोनवणे यांनी एचडीएफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़  चांदशी येथील रहिवासी प्रवीण बबन गणोरे यांनी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीची सर्व सुरक्षा प्लस ही विमा पॉलिसी काढलेली होती़ या पॉलिसीचा कालावधी २ डिसेंबर २०१६ ते १ डिसेंबर २०१९ असा असून, त्या अंतर्गत आठ विविध प्रकारचे संरक्षण देण्यात आलेले होते़ १५ मार्च २०१७ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला चेतन पावडे याने कट मारला़ गंगापूर धरण डावा तट कालव्याच्या पाटमोरीवर पावडे उभे असल्याने त्यास जाब विचारला असता त्याने शिवीगाळ व धक्काबुकी करून गणोरे यांना पाटात फेकून दिले़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गणोरे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रकिया करण्यात आली़ यामध्ये त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यांनी पोलीस ठाण्यात पावडेविरोधात गुन्हा दाखल केला़गणोरे यांनी एचडीएफसी इन्श्युरन्सकडे कायमच्या अपंगत्वासाठी ५ लाख, उपचारासाठी एक लाख व कर्ज सुरक्षेसाठी ३ लाख ४४ हजार ७७२ रुपयांच्या विम्यासाठी दावा केला असता त्यांनी मद्याच्या नशेत असल्याचे खोटे कारण दाखवून विम्याचा दावा नामंजूर केला़ याबाबत गणोरे यांनी अ‍ॅड़ एम़एस़ आंबाडे यांच्यामार्फत ग्राहक न्यायालयात दावा दाखल केला़ विमा कंपनीने कोणताही पुरावा नसताना डॉ़ देसाई यांचे डिस्चार्ज कार्डवरील हिस्टरी आॅफ अल्कोहोल कन्झम्पशन असा रिमार्क पाहून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले़ तसेच गणोरे यांना आलेले कायमस्वरूपी अपंगत्व हे अल्कोहोल कन्झम्पशनमुळे नाही तर पावडे नावाच्या व्यक्तीशी झालेल्या बाचाबाचीनंतर धक्का दिल्याने पाटात पडून झाल्याचे न्यायालयासमोर सिद्ध झाले़ त्यामुळे तक्रारदाराचा विमा नाकारण्याचा दावा विधिसंगत नसून कंपनीने सेवा देण्यात कमतरता केली असल्याचे समोर आले व न्यायालयाने भरपाईचे आदेश दिले़कार खरेदी करताना एचडीएफसीकडून घेतलेल्या कर्जाबरोबरच ‘सर्व सुरक्षा प्लस’ विमाही काढलेला होता़ कारला कट मारल्याचा जाब विचारल्याने मला मारहाण करून पाटात फेकून दिल्याने अपंगत्व आले़ तर विमा कंपनीने मद्यसेवन केलेले नसतानाही विमा नाकारला़ त्यामुळे ग्राहक न्यायालयात धाव घेतली अन् मला न्याय मिळाला़ मी अजूनही बेडवर असून न्यायालयाचे आदेश विमा कंपनीकडे मेल व कुरियरने पाठविले आहेत़; मात्र अद्यापपर्यंत विम्याची रक्कम मिळाली नसून पाठपुरावा सुरू आहे़  - प्रवीण गणोरे, चांदशी, नाशिक़

टॅग्स :Nashikनाशिक