शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पहिली, आठवी, दहावीचा बदलणार अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:19 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा व हवाहवासा वाटणारा अभ्यासक्रम येऊ घातला असून, त्या धर्तीवर पाठ्यपुस्तकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीसह आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक पडणार आहे.

पेठ : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा व हवाहवासा वाटणारा अभ्यासक्रम येऊ घातला असून, त्या धर्तीवर पाठ्यपुस्तकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीसह आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक पडणार आहे.  शालेय अभ्यासक्रमामध्ये नावीन्यता, विविध तंत्रज्ञान, अ‍ॅक्टिबेस लर्निंग, डिजिटीलायझेशन आणि घोकंपट्टी जाऊन उपक्रमशीलता, शालेय मूल्य व स्वयंअध्ययनाची सवय जोपासली जावी यासाठी आता यंदा इयत्ता आठवी आणि दहावीप्रमाणेच पहिलीचेही पाठ्यपुस्तक नव्याने तयार करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षातच (२०१८-१९) त्यानुसार आठवी आणि दहावीबरोबरच पहिलीची नवी पाठ्यपुस्तके बाजारात येणार आहेत, तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी आणि अकरावीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत.  राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती पूर्ण होते, तोच हे नवे धडे गिरवले जात आहेत. राज्यात २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार २०१३ पासून नवी पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. दरवर्षी टप्प्याटप्प्याने एकेका इयत्तेचे पुस्तक बदलण्यात आले. त्यानुसार यंदा आठवी आणि दहावीची नवी पुस्तके लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला.  मात्र त्याचबरोबर आता यंदाच पहिलीचेही पुस्तक बदलण्यातयेणार आहे. सध्या असलेली पहिलीची पुस्तक २०१३ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यात काही बदल करून २०१६ मध्ये पुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले. अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्व पुस्तके लागू होण्यापूर्वीच यंदापासून पहिलीचे पुस्तक बदलून पाठ्यपुस्तके बदलण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.  पुढील वर्षी (२०१९) इयत्ता दुसरी, तिसरी व अकरावीची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्राकडून (बालभारती) पाठ्यपुस्तक विक्रे त्यांना जुनी पुस्तके बदण्याची विनंती करणारे पत्र बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी पाठविले आहे. जुनी पुस्तके बालभारतीकडे जमा करण्याच्या सूचनाही वितरक व दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.एप्रिल २०१६ मध्ये पूर्वीच्या सरकारच्या कालावधीत तयार करण्यात आलेले सर्व अभ्यास मंडळे बरखास्त करत एकाच अभ्यास मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याबरोबर २०१६ मध्ये बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम काढून ते विद्या प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर पाचवीपासूनची पुस्तके ही नव्या अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात आली होती. गेल्या वर्षी अभ्यास मंडळात बदल करत काही सदस्यांना काढून नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली.आगामी शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचे धोरण महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांनी केले असून, भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकात क्यूआर कोडचा उपयोग करण्यात येणार असल्याने शिक्षकांना प्रोजेक्टच्या माध्यमातून अधिक प्रभावी अध्यापन करणे शक्य होणार आहे. म्हणून राज्यातील प्रत्येक शिक्षकाने टेक्नोसेव्ही होण्याची गरज आहे.  - डॉ. सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, मुंबई

टॅग्स :Schoolशाळा