नाशिक : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातील विविध जिल्ह्यांतून मराठा समाज मूक मोर्चा काढत असून औरंगाबाद, बीड, परभणी, जळगावनंतर हिंगोली, नांदेडमधील मराठा क्र ांती मूक मोर्चासाठी विक्रमी समाजबांधव जमल्यानंतर नाशिकमधील मोर्चासाठी १५ लाखांहून अधिक समाजबांधव जमणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यासाठी शहरातील विविध प्रभागांसह जिल्हाभरातील गावागावांमध्ये समाजाच्या बैठका सुरू असून, नाशिकमधील मराठा क्रांती मूक मोर्चाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विराट मराठा मोर्चे निघत असून, त्यादृष्टीने नाशिकमध्ये शनिवारी (दि.२४) काढण्यात येणाऱ्या क्रांती मोर्चाची तयारी वेगात सुरू असून, सर्व मराठा संघटनांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी जिल्हाभरात नियोजन बैठका घेण्यात येत आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चाचे काउंटडाउन सुरू
By admin | Updated: September 20, 2016 01:07 IST