शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्यांबाबत समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 1:11 AM

नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या ३१ मेअखेर बदल्या करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेने कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी शुक्रवारी समुपदेशन ठेवले असून, त्यात जिल्ह्यात संवर्गनिहाय व तालुकानिहाय रिक्त असलेल्या जागा व बदलीपात्र कर्मचाºयांची माहिती सादर करून कर्मचाºयांना सोयीचे ठिकाण निवडण्याची संधी दिली जाणार आहे.

ठळक मुद्देदहा टक्केच होणार बदल्या : आज सर्व खात्यांना मार्गदर्शन

नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांच्या ३१ मेअखेर बदल्या करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेने कर्मचाºयांच्या बदल्या करण्यासाठी शुक्रवारी समुपदेशन ठेवले असून, त्यात जिल्ह्यात संवर्गनिहाय व तालुकानिहाय रिक्त असलेल्या जागा व बदलीपात्र कर्मचाºयांची माहिती सादर करून कर्मचाºयांना सोयीचे ठिकाण निवडण्याची संधी दिली जाणार आहे.शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून मविप्रच्या वाघ गुरुजी शाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्या उपस्थितीत प्रत्येक खाते प्रमुख आपल्या विभागाची माहितीचे सादरीकरण करणार आहे. त्यात प्रामुख्याने आदिवासी व बिगर आदिवासी भागातील रिक्त जागा, अशा जागांवरील बदली पात्र कर्मचारी, प्रशासकीय व विनंतीनुसार बदली करू इच्छिणाºयांना यात सामावून घेण्यात येणार आहे. राज्य सरकारने एकूण कर्मचाºयांच्या तुलनेत फक्त दहा टक्के बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्रदान केले आहेत. त्यानुसार माहिती गोळा केली जात होती. त्यात आदिवासी व बिगर आदिवासी असे दोन वर्गीकरण करण्यात आले होते.शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन, आरोग्य, बांधकाम, लघुपाटबंधारे, समाजकल्याण, महिला व बालविकास, कृषी, पशुसंवर्धन या विभागांना वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात रिक्त असलेल्या जागांची माहिती बदलीपात्र कर्मचाºयांना दिली जाईल व तेथे बदलून जाण्यासाठी तयार असलेल्या; परंतु ज्येष्ठ कर्मचाºयाला प्राधान्य देण्यात येणार आहे. बदलीपात्र कर्मचाºयांमध्ये बिगर आदिवासी भागात जाण्यास शक्यतो कोणी तयारी दर्शवित नाही, प्रत्येकाला सोयीच्या बदल्या हव्या असतात. अशावेळी कर्मचाºयांना रिक्त पदे, तालुक्याचे ठिकाण समुपदेशनातून कळण्यास मदत होणार आहे. शिक्षकांचे मॅपिंग सुरू या बदल्यांमधून शिक्षक व मुख्याध्यापकांना मात्र वगळण्यात आले आहे. शिक्षकांच्या बदल्या शासनाने आॅनलाइन केल्या असून, त्यामुळे सध्या जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक तसेच शाळांचे आॅनलाइन मॅपिंग केले जात आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतरच शिक्षकांना आॅनलाइन बदल्यांसाठी अर्ज सादर करता येणार आहे.