शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या एकाग्रता वाढीसाठी राज्यातील शाळांमध्ये समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:47 IST

वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे.

नाशिक : वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मनशक्ती प्रयोग केंद्राद्वारे समुपदेशन उपक्र म राबविला जात आहे.  चंचलता हा बालकांचा स्थायीभाव असून, वाढत्या वयानुसार मुले एकाग्र होऊन अभ्यासाकडे वळतात, हाच त्यांच्या जीवनाचा पाया असतो, असे बालमानसशास्त्रज्ञ स्पष्ट करतात. परंतु आजच्या काळात भरमसाठ इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळे वाढत्या वयातही मुलांच्या अंगी असलेली चंचलता कायम राहून कोणत्याही एका गोष्टीत त्यांचे लक्ष लागत नाही. कालांतराने त्यांच्या मनात नैराश्य निर्माण होऊन साहजिकच अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. त्यातून अपयश येण्याचा धोका वाढतो. या समस्येवर मात करण्यासाठी मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेने राज्यभरातील शाळांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य समुपदेशन तसेच मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शाळांमधील शिक्षकांना या उपक्र मात सहभागी करून घेतले जात आहे. त्यांनाही यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्या मुलांच्या बाबतीत वारंवार नैराश्यसारखी गंभीर समस्या असेल त्यांच्या पालकांसाठीदेखील अभ्यास वर्ग व कार्यशाळा घेण्यात येत आहेत. मनशक्ती प्रयोग केंद्राचे मुख्य कार्यालय लोणावळा येथे आहे. नाशिक शहरातील रचना विद्यालय, पुरु षोत्तम हायस्कूल, स्वामी विवेकानंद आदी शाळांमध्ये तीन ते पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा, समुपदेशन वर्ग घेतल्याचे केंद्राच्या समन्वयकांनी सांगितले.राज्यभरात ५० शहरांमध्ये उपक्रमराज्यभरातील ५० शहरांत विविध ठिकाणी असलेल्या उपकेंद्रातील अनेक कार्यकर्ते गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्र म राबवित आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक आदी शहरांमधील शाळांमध्ये मनशक्ती केंद्राने राबवलेल्या मुलांच्या बाबतीत उपक्र मांचा सकारात्मक बदल घडून आला आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी