शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला पाणी मीटर बसविण्यास नगरसेवकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:53 IST

त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : मुख्याधिका-यांवर लाभाचा संशय

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. नगरपालिकेने ठराव करून पाणी मीटरला विरोध केलेला असतानाही मुख्याधिकाºयांनी त्यासाठी निविदा काढल्यामुळे यात त्यांचा वैयक्तिक लाभ असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही ही वस्तुस्थिती असताना मुख्याधिकाºयांनी मीटरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नगरपालिकेच्या ३ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी ठरावाद्वारे त्यास विरोध केला आहे. शहरातील नागरिकांना महागड्या दराने पिण्याचे पाणी परवडणारे नाही. नगरपालिकेस नगर विकास सप्ताहाच्या निमित्ताने अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून नागरिक व भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मुख्याधिकाºयांकडून या अडीच कोटी रुपयांचा वापर महागडे पाणी मीटर खरेदी करण्यासाठी केला जात आहे. त्यासाठी त्यांनी जाहिरात देऊन निविदाही मागविल्या आहेत. पाणी मीटर बसविण्यास जिल्हाधिकाºयांची संमती असल्याचे दाखवून दिशाभूल केली जात असून, नगरपालिकेच्या संपत्तीचा आपल्या अट्टहासासाठी दुरुपयोग केला जात असल्याचे म्हटले आहे. नगरपालिकेने २५ ते ३० नागरिकांना २४ तास स्पेशल कनेक्शन दिले आहे; मात्र अद्याप त्यांना तासभरदेखील पाणी मिळालेले नाही. यापूर्वीही नागरिकांना दीड हजार रुपयांप्रमाणे पाणी मीटर घेण्यास भाग पाडले होते. त्या मीटरचे काय झाले याची चौकशी करावी व मीटर योजना लागू करू नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, स्वप्निल शेलार, अनिता बागुल, विष्णू दोबाडे, शिल्पा रामायणे, शीतल उगले, कैलास चोथे, माधवी भुजंग, सायली शिखरे, संगीता भांगरे, भारती बदादे, सागर उजे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक