शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्टवादीची आज घोषणा शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:19 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना वगळता भाजपा व राष्टÑवादी आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली असून, विशेषत: भाजपाने शिवसेनेला एकतर्फी पाठिंबा दिला तर पुढे काय असा प्रश्न भाजपाच्या इच्छुकांना पडला आहे. दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्षांतर्गत निवडणुका सुरू असल्यामुळे उमेदवार घोषित करण्यात येणारी अडचण रविवारी संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना वगळता भाजपा व राष्टÑवादी आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली असून, विशेषत: भाजपाने शिवसेनेला एकतर्फी पाठिंबा दिला तर पुढे काय असा प्रश्न भाजपाच्या इच्छुकांना पडला आहे. दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्षांतर्गत निवडणुका सुरू असल्यामुळे उमेदवार घोषित करण्यात येणारी अडचण रविवारी संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवर शिवसेनेने सर्वात आधी नरेंद्र दराडे यांच्या नावाची घोषणा करून बाजी मारली आहे. शिवसेनेच्या खालोखाल संख्याबळ असलेल्या भाजपाने याबाबत सोयीस्कर मौन पाळले असून, भाजपा ही जागा लढवणार की नाही याचाही स्पष्ट उलगडा पक्षाकडून होऊ शकला नसला तरी, उमेदवारीसाठी भेटणाऱ्या इच्छुकांना भेटीदेखील नाकारल्या जात नसल्याने इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींची मूक संमती समजून व्यक्तिगत पातळीवर प्रचाराला सुरुवातही केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असतानाही पक्षाकडून अधिकृत काहीच निरोप येत नसल्यामुळे ते पण आता संभ्रमात सापडले आहेत. लोकसभेच्या व विधानसभेच्या पोटनिवडणुका पाहता त्या भाजपासाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. या निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच त्याकडे पाहिले जाणार असल्याने भाजपाला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युतीची गरज आहे. भाजपाने नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेला एकतर्फी पाठिंबा घोषित करून निवडणुकीतून माघार घेतली तर इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेल्या परवेज कोकणी यांनी व्यक्तिगत पातळीवर मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या, परंतु ही निवडणूक ‘सर्वार्थाने’ प्रेरित असल्याने पक्षाने उमेदवारी दिल्याशिवाय मतदारांशी ‘जवळीकता’ करणे परवडणारे नाही याचा विचारही केला जात आहे. राष्टवादीकडून अशोक सावंत यांचे नाव घेतले जात असले तरी, त्यांच्या राजकीय वाटचालीचा विचार करता ते अखेरपर्यंत निवडणुकीच्या मैदानात टिकण्याविषयी शंका घेतली जात आहे. मात्र सावंत यांनी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. पक्षांतर्गत निवडणूक सुरू असल्याने सारे प्रमुख पदाधिकारी गुंतल्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रविवारी दुपारनंतर राष्टÑवादीची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.शिवाजी सहाणे सर्वपक्षीय उमेदवार?विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हकालपट्टी केलेले शिवाजी सहाणे यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार केला असून, त्यासाठी राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. मध्यंतरी त्यांनी राष्टÑवादीकडून चाचपणी करून पाहिली, परंतु फारसा प्रतिसाद दोन्ही बाजूंकडून न मिळाल्याने आता त्यांनी शिवसेना वगळता अन्य पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा व सर्वपक्षीय उमेदवारी करावी, असा प्रस्ताव दिला आहे. दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीने भाजपाकडून उमेदवारीसाठीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस