शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:49 IST

शेतकरी हवालदिल : पंचनामे करण्याची मागणी

ठळक मुद्देवर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला

सायखेडा : निफाड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तळवाडे, महाजनपुर, पिंपळगाव निपाणी, बागलवाडी,औरंगपूर या गावातील शेतक-यांनी केली आहे. यासंदर्भात शेतक-यांनी निफाड तहसील कार्यालयाला नवेदन दिले आहे.निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील सदर गावे कमी पर्जन्य छायेत येतात. आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी असते. वर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. पाऊस कमी आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने जमीन असूनही पाण्याअभावी पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यांना दिलासा म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. सोयाबीन, मका, टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतात मोठया प्रमाणावर भांडवली खर्च करून शेतक-यांनी उभी केली. एकरी ६० ते ७० हजार रु पये खर्च करूनही पिके हाती येत नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, यासंदर्भात निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यासाठी शेतकरी गेले असता तहसीलदार उपस्थित नसल्याने कार्यालयात लिपिकांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरपंच लता सांगळे, माजी सरपंच राजेंद्र सांगळे, बचवंत फड, देविदास खाडे, जयराम सांगळे, संदीप फड ,भाऊसाहेब फड यासह शेतकरी उपस्थित होतेनुकसान भरपाई द्यावीतळवाडे ,महाजनपुर, निपाणी पिंपळगाव या भागातील नगदी पिके पाण्याअभावी करपून गेल्याने भांडवल वाया गेले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- राजेंद्र सांगळे, तळवाडे

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस