नाशिक : वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयुक्त मानली जात असताना, हीच थंडी आता हाताशी आलेल्या कापूस पिकासाठी मारक ठरण्याची भीती कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असून, थंडीचे प्रमाण वाढल्यास कापसावर पडणाऱ्या बोंड अळीसाठी पोषक ठरत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून निष्पन्न झाल्याने शेतातील उभे पीक संकटात सापडल्यामुळे राज्यातील कृषी खात्यानेही चिंता व्यक्त केली आहे.जिल्ह्णातील येवला, नांदगाव, सिन्नर या भागांतील कपाशीचे पिकाचे बोंडे पक्व होऊन कापूस वेचणी योग्य होत आहे. नेमक्या त्याच वेळी थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने कापूस उत्पादकांना धडकी बसली आहे. या वर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यापर्यंत सरासरी दिवसाचे तपमान ३५ अंश सेल्सियस असल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. परंतु आता यापुढे तपमान जस जसे कमी होत जाईल तशी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात वाढ होणार असल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे.आर्द्रता बोंडअळीला पोषकनाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचे तपमान ११ ते १४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले असल्यामुळे दिवसाची आर्द्रता ७१ ते ८० टक्के व रात्रीची आर्द्रता २६ ते ३५ टक्के इतकी आहे. नेमकी हीच बाब कापसावर मारा करणाºया बोंडअळीला पोषक मानली जात आहे.
कापसाला बोंडअळीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:50 IST
वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयुक्त मानली जात असताना, हीच थंडी आता हाताशी आलेल्या कापूस पिकासाठी मारक ठरण्याची भीती कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असून, थंडीचे प्रमाण वाढल्यास कापसावर पडणाऱ्या बोंड अळीसाठी पोषक ठरत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून निष्पन्न झाल्याने शेतातील उभे पीक संकटात सापडल्यामुळे राज्यातील कृषी खात्यानेही चिंता व्यक्त केली आहे.
कापसाला बोंडअळीचा धोका
ठळक मुद्देथंडी : उत्पादक, कृषिखात्याला धडकी; नुकसानीची भीती