शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोथिंबीर मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:08 AM

पंचवटी : गेल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या बळीराजाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने बुधवारी (दि. २७) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड कोथिंबीर मालाची आवक झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. काही कोथिंबीर जुड्यांचा लिलाव न झाल्याने नाराज शेतकºयांना जनावरांसाठी कोथिंबीर माल सोडून द्यावा लागल्याचे चित्र बाजार समितीत दिसून आले.

ठळक मुद्देमेथी ३५, शेपू २०, कांदापात ३० रुपये प्रति जुडीपावसाने उघडीप दिल्याने आवक वाढलीकोथिंबीरच्या चांगल्या मालाला ४००० रुपये शेकडा

पंचवटी : गेल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या बळीराजाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने बुधवारी (दि. २७) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड कोथिंबीर मालाची आवक झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. काही कोथिंबीर जुड्यांचा लिलाव न झाल्याने नाराज शेतकºयांना जनावरांसाठी कोथिंबीर माल सोडून द्यावा लागल्याचे चित्र बाजार समितीत दिसून आले.बुधवारी (दि. २७) बाजार समितीत यंदाच्या वर्षातील रेकॉर्डब्रेक कोथिंबीर मालाची आवक झाली. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी अशाप्रकारे कोथिंबीरची आवक झाली होती, असे व्यापाºयांनी सांगितले. कोथिंबीरला मातीमोल बाजारभाव मिळाला असला तरी मेथी, कांदापात, शेपू या भाजीपाला जुड्यांना चांगला बाजारभाव मिळाला.गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी बाजार समितीत प्रचंड कोथिंबीर माल दाखल झाला. एरवी ओस पडलेला बाजार समिती आवार केवळ कोथिंबीरच्या ढिगाºयांनी भरगच्च झाल्याचे दिसून आले. तर ज्या चारचाकी वाहनांतून कोथिंबीर शेतमाल आणला जात होता अशा वाहनातील शेतमाल खाली करण्यासही जागा अपुरी पडत होती. कोथिंबीर मालाने बाजार समितीचे आवार भरगच्च झाले होते.सायंकाळी सात वाजेनंतर तर बाजार समितीत वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालकांना वाहने घेऊन बाजार समिती बाहेर पडण्यासाठी कसरत करीतच वाहने न्यावी लागली.बुधवारी सायंकाळी प्रचंड आवक आली होती. कोथिंबीरच्या काही मोठ्या जुड्या व चांगल्या मालाला ४००० रुपये शेकडा, (४० रुपये प्रति जुडी) तर हलक्या मालाला केवळ २०० रुपये शेकडा (२ रुपये प्रति जुडी) असा बाजारभाव मिळाला तर काही माल ओलसर असल्याने अशा मालाचा लिलाव झाला नाही. काही जुड्यांना मातीमोल बाजारभाव मिळाल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकºयांचा लागवड खर्च, दळणवळण खर्च न सुटल्याने त्यांनी जनावरांना शेतमाल सोडून काढता पाय घेतला तर काहींनी हातात पडेल ती रक्कम घेऊन समाधान मानले. कोथिंबीर वगळता मेथी ३५, शेपू २० तर कांदापात ३० रुपये प्रति जुडी दराने विक्र झाली.खराब मालामुळे बाजार कोसळलेपावसाने उघडीप दिल्याने बुधवारी सायंकाळी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मालाची आवक झाली. आवक जास्त झाल्याने तसेच बराचसा कोथिंबीर माल खराब व ओला असल्याने काही मालाचा लिलाव झाला नाही तर मंगळवारी (दि. २६) कोथिंबीर ७० रुपये जुडी व बुधवारी ३ रुपये जुडी असा बाजारभाव मिळाल्याने काही शेतकºयांनी लिलाव रद्द करून शेतमाल बाजार समितीत जनावरांना सोडून दिला.- चंद्रकांत निकम, संचालक बाजार समितीआवक वाढल्याने बाजार कोसळलेनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल दोन वर्षांपूर्वी असाच कोथिंबीर माल दाखल झाला होता. बुधवारी (दि. २७) सायंकाळी रेकॉर्डब्रेक कोथिंबीरची आवक झाली. आवक वाढल्याने बाजारभाव २ रुपये जुडीवर आले तर काही कोथिंबीर मालाचे लिलाव झाले नाही.- नितीन लासुरे, व्यापारी

कोथिंबीरच्या चांगल्यामालाला ४००० रुपये शेकडा

पावसाने उघडीपदिल्याने आवक वाढली

मेथी ३५, शेपू २०, कांदापात३० रुपये प्रति जुडी