शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने उलटूनही रस्ता होईना दुरूस्त; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:45 IST

गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर या सर्व भागांतील रहिवाशांच्या दैनंदिन वापराचा हा महत्त्वाचा रस्ता आहे.

ठळक मुद्देहा रस्ता भुयारी गटार कामात पूर्णपणे नष्ट झाला आहे. पूर्व बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले

नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते गोपालवाडी या रस्त्याची दुरवस्था होऊन तीन महिने उलटले आहे, तरीदेखील अद्याप रस्ता दुरुस्त करण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. भूमिगत गटार कामासाठी रस्ता जेसीबीने उद्ध्वस्त केला गेला. गटारीचे काम पूर्णत्वास येऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते श्री. श्री. रविशंकर मार्गापर्यंत गोपालवाडीरोड आहे. भेंडीवाले बाबा दर्ग्यापासून थेट या रस्त्यावरून महापालिकेच्या भुयारी गटार विभागाकडून जेसीबीने खोदकाम करून भुयारी गटार टाकली गेली. या कामाला तब्बल दोन महिने उलटले आहेत, तरीदेखील अद्याप खोदकामाने उद््ध्वस्त झालेला रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने या भागातील रहिवाशांनी नेमके कोणत्या मार्गाने जावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर या सर्व भागांतील रहिवाशांच्या दैनंदिन वापराचा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. हा रस्ता भुयारी गटार कामात पूर्णपणे नष्ट झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे व मातीचे ढीग साचले असून, या रस्त्यावरून पायी जाणेदेखील अवघड आहे. त्यामुळे वाहने नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनपाच्या पूर्व बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे, कारण हा रस्ता भुयारी गटार कामात उद्ध्वस्त झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका